28 May 2020

News Flash

मुंबईला मिळणार पहिल्या महिला पोलीस आयुक्त; ‘यांचे’ नाव स्पर्धेत

संजय बर्वे यांना मुदतवाढ न मिळाल्यास मुंबईला पहिल्या महिला पोलीस आयुक्त मिळणार का, हे ३१ ऑगस्टपर्यंत स्पष्ट होणार आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना मुदवाढ न मिळाल्याने नवा पोलीस आयुक्त कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, मुंबईला पहिल्या महिला पोलीस आयुक्त मिळण्याची शक्यता आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला आणि लाचलुचपत विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांची नावे सध्या स्पर्धेत आहेत.

राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी बदली होण्यापूर्वी रश्मी शुक्ला यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तपदावरही काम केले आहे. सध्या शुक्ला आणि लाचलुचपत विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मागच्या वेळी सुबोध जायस्वाल यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदी बढती मिळाल्यानंतर परमबीर सिंह यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंह यांच्याऐवजी बर्वे यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे संजय बर्वे यांना मुदतवाढ न मिळाल्यास मुंबईला पहिल्या महिला पोलीस आयुक्त मिळणार का, हे ३१ ऑगस्टपर्यंत स्पष्ट होणार आहे.

पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यांना मुदतवाढ द्यायचा की नाही, यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत. २००८ मध्ये पोलीस महासंचालक पी. एस. पसरीचा आणि मुंबईचे तत्कालीन आयुक्त डी.एन. जाधव यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने मात्र, हा निर्णय फेटाळून लावला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश स्वतंत्र कुमार आणि न्यायमूर्ती आय.पी. देवधर यांनी, अशा प्रकारे मुदतवाढ देण्याचा निर्णय कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिणाम करणारा आहे, असे निरीक्षण नोंदवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 4:43 pm

Web Title: will mumbai soon get its first woman police chief bmh 90
Next Stories
1 मेट्रोविरोधात शिवसेना आमदार तुकाराम काते रस्त्यावर
2 Video: “विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही!”
3 प्रवाशांना दिलासा; आजपासून मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्ववत
Just Now!
X