हवाई गुप्तचर विभागाने मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका केनियन महिलेला अटक केली. एकावर एक सहा अंतर्वस्त्र घालून त्यात तिने तब्बल ५४ लाखांचे सोन्याचे दागिने दडवून आणले होते.
जामा हलिमा दबिर (४०) ही केनियन महिला शुक्रवारी पहाटे दोन वाजता नैरोबीहून मुंबई विमानतळावर उतरली होती. हवाई गुप्तचर विभागाला तिचा संशय आल्याने तिची कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिने अंतर्वस्त्रात २ हजार ग्रॅम सोने दडवून ठेवल्याचे आढळले. पहिल्या अंतर्वस्त्रावर तिने एका प्लॅस्टिकच्या पिशवीत हे दागिने लपवले होते. त्यावर तिने आणखी पाच अंतर्वस्त्रे घातली होती. सोन्याच्या बांगडय़ा, कडे आणि हार असे हे दागिने होते. म्
आफ्रिकी देशातील नागरिक एरवी अंमली पदार्थाच्या तस्करीत सामील असतात. पण सोन्याची तस्करी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी ही महिला तीन वेळा भारतात आली होती. त्यावेळीही तिने अशापद्धतीने तस्करी केली असावी असा संशय आहे.