मुंबईमध्ये सध्या नवरात्रोत्सवानिमित्त कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. अनेक ठिकाणी पोलिसांची दिवस-रात्र करडी नजर आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी नेहमीच २४ तास ऑन ड्युटी पोलिसांना सणासुदीच्या दिवसांमध्ये अधिक काम करावे लागते. मात्र तरीही पोलिसांच्या कामात कुठेही कसूर झालेला दिसत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या दोन महिला कॉन्सटेबलच्या कामगिरीतून आली.

सोमवारी रात्री शहरातील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करुन पळ काढणाऱ्या दोन चोरांना मुंबई पोलिसांच्या दोन महिला कॉन्सटेबलने पाठलाग करुन अटक केली. आरे येथे रात्रपाळीला पोलीस मोबाईल व्हॅन क्रमांक पाचवर पोलीस शिपाई मराठे आणि शिंदे या तैनात होत्या. गस्त घालत असताना या दोघींना गोरेगाव पूर्व येथील विरवाणी बसस्टॉपजवळ एका व्यक्तीवर दोन जण हल्ला करताना दिसले. हल्लेखोरांनी एका पादचाऱ्याच्या डोक्यात वार करुन त्याला जखमी करुन त्याच्याकडून मोबाईल व पैसे घेऊन पळ काढत होते. वेळीच घटनास्थळी पोहोचलेल्या या दोघींनी शिताफीने या दोन सराईत चोरांचा पाठलाग करुन त्यांना अटक केली. जखमी पादचाऱ्यालाही वेळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघींनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे पादचाऱ्यांचे प्राण तर वाचलेच शिवाय दोन चोरांनाही अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या कामगिरीमुळे मुंबई पोलीस दलातील या दोन्ही नवदुर्गांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल