स्पर्शातूनच महिलेला पुरुषाचा हेतू समजलेला असतो असं एक निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवलं आहे. न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे निरीक्षण नोंदवलं आहे. एका खटल्याबाबत सुनावणी करताना त्यांनी हे निरीक्षण नोंदवलं आहे.

उद्योगपती विकास सचदेव यांच्या विरोधात एका महिला कलाकाराने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. ही घटना डिसेंबर २०१७ मधली आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने विकास सचदेव यांना दोषी ठरवलं. त्यांना तीन वर्षांची शिक्षाही सुनावली. याच याचिकेला स्थगिती देण्यसाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने तूर्तास त्यांची शिक्षा स्थगित केली आहे. तसेच सचदेव यांची पूर्ण बाजू काय आहे हे ऐकण्यासही होकार दिला. त्याचवेळी न्यायालयाने पुरुष जेव्हा एखाद्या महिलेला स्पर्श करतो किंवा तिच्याकडे ज्या नजरेने बघतो त्यामागचा हेतू तिला कळलेला असतो असे निरीक्षण नोंदवले आहे.