कार्यालयीन आणि घरकामाचे दुहेरी आव्हान

मानसी जोशी, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमुळे घरकाम करणाऱ्या महिलांनाही सुट्टी द्यावी लागल्याने कार्यालयीन व घरकामाचे असे दुहेरी आव्हान सध्या सक्तीच्या ‘सुट्टी’वर असलेल्या नोकरदार महिलांना पेलावे लागत आहे. या दुहेरी कसरतीवर अनेक महिलांनी यावर आपापल्या परीने उपाय शोधले आहेत.

पुरुषांसोबतच अनेक महिलांनाही घरातून काम करावे लागत आहे. मात्र एरवी नोकरदार महिलांची घर आणि कार्यालय ही कसरत घरकाम, स्वयंपाक, मुले सांभाळण्याकरिता असलेल्या मदतनीसांमुळे सुकर होते. परंतु, टाळेबंदीमुळे कु णालाच कामावर येणे शक्य नसल्याने ही जबाबदारी कु टुंबीयांवर येऊन पडली आहे. पती-पत्नी-मुले असे  चौकोनी कु टुंब असलेल्या महिलांच्या शारिरिक आणि मानसिक क्षमतांचा कस लागत आहे.

पती किं वा कु टुंबातील इतर सदस्यांची मदत असेल तर ठीक, परंतु आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरीही त्यांच्या वाटचे चूल आणि मूल सुटलेले नाही. आजही फार कमी घरांमध्ये या जबाबदाऱ्या कु टुंबातील इतर सदस्यांकडून पेलल्या जातात. बहुतांश महिला स्वयंपाक, घराची स्वच्छता, धुणीभांडी, मुलांचा अभ्यास आदी सांभाळत कार्यालयीन कामे करत आहेत.

घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना व्यावसायिक जीवनाकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कामाचा दर्जाही खालावत आहे. त्यामुळे  करोनाच्या सुट्टीत घरून काम करणे त्रासदायक असल्याचे मत अनेक महिला व्यक्त करत आहेत. घरकामासाठीच्या मदतनीस येत नाही आहेत. घरातील पुरुष टाळाटाळ करत असल्याने दररोजची सर्व कामे मलाच करावी लागतात. यामुळे प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. घरातील काम करून परत कार्यालयीन काम करण्यास उत्साह जाणवत नसल्याचे मत प्रीती जोशी हिने व्यक्त के ले. एकाच जागी सहा ते सात तास सलग काम के ल्याने शारीरिक आजारही बळावत आहेत. त्यात मासिक पाळी असल्यास घरातील आणि कार्यालयीन काम करताना ताणतणाव, चिडचिड होत असल्याचे महिलांनी नमूद के ले.

त्यात कु टुंबीयांच्या मागण्या, मुलांची बडबड यामुळे ऑफिसच्या कामात व्यत्यय येतो. या समस्येवर उपाय म्हणून कामे वाटून घेणे, मुलांना कामात गुंतवून ठेवण्याचे उपाय योजले जात आहेत. ‘कार्यालयीन काम स्वतंत्र खोलीत बसून करते. सकाळी ऑफिसचे काम करण्यापूर्वी सर्व घरकाम आटोपून ठेवते. कामादरम्यान मुलांच्या मेंदूला खाद्य पुरवणारी शब्दकोडी, प्रश्नमंजुषा यासारखे देत राहते, असे शर्वरी कुलकर्णी यांनी सांगितले.  ‘दोन्ही गोष्टींसाठी ठरावीक वेळ दिल्याने घर आणि कामाचा समतोल राखला जातो. घरातच काम करत असल्याने ऑफिसला जाण्या-येण्याचा प्रवास वाचतो.  तसेच थकवाही जाणवत नाही,’ असे  पुण्याच्या सुप्रिया पराडकर हिने सांगितले. तर पीआर क्षेत्रात काम करणारी रश्मी आपटे सांगते की, दिवसातील काही वेळ मी कामासाठी राखून ठेवला आहे. त्या वेळेत कलाकारांच्या मुलाखती ठरवणे, त्यांच्याकडून माहिती घेणे, नवीन मालिका, वेब सीरिज प्रदर्शित होत असल्यास नियोजन या गोष्टी करते. कुटुंबीयांना याची कल्पना असल्याने मला काम करताना सहकार्य करत असल्याचे ती सांगते.

कामाच्या वेळा ठरवण्यासाठी अ‍ॅपचा वापर

कामाचे नियोजन काही अ‍ॅपच्या मदतीने करत असल्याचे प्रीती जोशी हिने सांगितले. गूगल तसेच मायक्र ोसॉफ्टच्या कॅ लेंडरमध्ये दिवसाच्या दिनक्र माची  नोंदणी करून ठेवते. ‘टाइम टू टाइम’, ‘डेली’ आणि ‘विकली प्लॅनर’ या अ‍ॅप्समुळे घरातील तसेच ऑफिसमधील कामे लक्षात राहात असल्याचे तिने सांगितले.