28 February 2021

News Flash

धक्कादायक! पनवेल-अंधेरी ट्रेनमध्ये तरुणीसमोर हस्तमैथुनाचा प्रयत्न

लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात घुसलेल्या विकृताने तरुणीसमोर हस्तमैथुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री पनवेल-अंधेरी मार्गावरच्या लोकल ट्रेनमध्ये हा प्रकार घडला.

लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात घुसलेल्या विकृताने तरुणीसमोर हस्तमैथुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री पनवेल-अंधेरी मार्गावरच्या लोकलमध्ये हा प्रकार घडला. या घटनेमुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर २४ वर्षीय तरुणी पनवेल येथे ट्रेकिंगसाठी गेली होती. ट्रेकिंग झाल्यानंतर तिने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पनवेल स्थानकातून अंधेरी येथे जाणारी लोकल पकडली.

महिला डब्ब्यामध्ये ही तरुणी एकटीच होती. ट्रेन सुरु झाल्यानंतर धावत एका युवकाने ही ट्रेन पकडली. सुरुवातीला तिला वाटले कि, प्रचंड घाईमध्ये असल्यामुळे तो चुकून महिला डब्ब्यामध्ये आला असावा. पण काही वेळाने या युवकाने त्याच्या पँटची चैन काढली व तिच्यासमोर हस्तमैथुनाचा प्रयत्न केला. जेव्हा तिने आरडाओरडा केला तेव्हा त्याने त्याच्या गुप्तांगावर हात फिरवण्यास सुरुवात केली.

जेव्हा तिने त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने तिच्यावर झडप घालून तिचा मोबाइल हिसकावून घेतला. तिने त्याचा प्रतिकार केला. लोकल खांडेश्वर स्थानकाजवळ येताच तिने प्लॅटफॉर्मवरच्या लोकांना सर्तक करण्यासाठी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. पण तो पर्यंत आरोपीने डब्ब्यातून बाहेर उडी मारली होती. पळताना त्याने तिचा मोबाइल पुन्हा डब्ब्यात फेकून दिला.

पनवेल पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला वसई रेल्वे पोलिसांनी अशाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी याआधी अटक केली होती का ? त्याची पनवेल रेल्वे पोलीस खातरजमा करत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आरोपी ट्रेन पकडताना दिसलेला नाही पण खांडेश्वर स्थानकात उतरताना तो फुटेजमध्ये दिसत आहे. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटवणे थोडे कठिण जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 5:04 pm

Web Title: youth flashes at woman in running train
टॅग : Molestation
Next Stories
1 नालासोपाऱ्यात कडकडीत बंद
2 वयोवृद्ध महिलेला फसवून साडेतीन लाखांची लूट
3 खारफुटी रोपणासाठी मुंबई पालिकेला २४ हेक्टर जमीन
Just Now!
X