अज्ञात मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत निकित मसुरेकर (२०) हा तरुण ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री भायखळा येथे घडली. या प्रकरणी पोलीस त्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत. प्रणित तांबडे यांनी अपघाताबाबत पोलिसांकडे फि र्याद दाखल केली आहे. मयत निकित आणि फिर्यादी प्रणित हे दोघे मोटारसायकलवरून प्रवास करत असताना एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने (क्रमांक- एम. एच. ०३ वाय ७६६३) निकित व प्रणितच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली.