मुंबई: मुंबईत बुधवारपासून १२ ते १४ वयोगटातील  बालकांचे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण  सूरू होणार आहे. पालिकेने सुरुवातीला दोन दिवस प्रायोगिक तत्त्वावर १२  केंद्रांवर दुपारी १२ वाजल्यापासून लसीकरणाचे आयोजन केले आहे.

या केंद्रावरील अडचणी, प्रतिसाद  आणि आरोग्य सुविधांसह इतर बाबींचा विचार करून पालिकेच्या सर्व केंद्रांवर या वयोगटासाठीचे लसीकरण  आयोजित करण्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. पालिका क्षेत्रातील विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे आदींचेही सहकार्य घेतले जाणार आहे.   

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

कोविन प्रणालीमध्ये या लसीकरणासंदर्भात आवश्यक बदल उद्या सकाळपर्यंत होणे अपेक्षित आहेत. केंद्र शासनामार्फत कोविन प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्यामुळे १२ वर्षे पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांची  लसीकरणासाठी नोंदणी होऊ शकते. पालकांनी आपल्या १२ वर्षे पूर्ण झालेल्याच पाल्यास लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

लसीकरण केंद्रांची यादी : १. ई विभाग – टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर धर्मादाय रुग्णालय, मुंबई सेंट्रल २. ई विभाग – ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय, नागपाडा, मुंबई सेंट्रल ३. एफ उत्तर विभाग –  लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, शीव (पूर्व) ४. एफ दक्षिण – राजे एडवर्ड स्मारक  (के.ई.एम.) रुग्णालय, परळ ५. एच पूर्व – वांद्रे-कुर्ला संकुल (बी. के. सी.) जम्बो करोना लसीकरण केंद्र, वांद्रे (पूर्व) ६. के पूर्व – सेवन हिल्स रुग्णालय, वांद्रे (पूर्व), ७. के पश्चिम झ्र् डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम)   ८. पी दक्षिण – नेस्को जंबो कोविड लसीकरण केंद्र, गोरेगांव (पूर्व), ९. आर दक्षिण – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय, कांदिवली (पश्चिम), १०. एन विभाग – राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व).   ११. एम पूर्व विभाग झ्र् पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालय (शताब्दी रुग्णालय), गोवंडी, १२. टी विभाग – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालय, मुलुंड.

ही बालके पात्र

१ जानेवारी २००८ ते १५ मार्च २०१० या काळात जन्मलेली  बालके पात्र असतील. १२ वर्षे पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना ‘कोर्बेव्हॅक्’’ ही लस हातावर स्नायूमध्ये देण्यात येणार आहे. २८ दिवसाच्या अंतराने  या लशीच्या  दोन मात्रा देण्यात येणार आहेत.