मुंबईतील नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. सोमवारी १२३३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर एकाच दिवसात २०९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर हळूहळू पुन्हा एकदा कमी होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीड ते दोन हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद होत असताना सोमवारी १२३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २,४३,१७२ झाली आहे.

आतापर्यंतच्या मृतांमध्ये अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्वचा भाग असलेल्या के पूर्व प्रभागात सर्वाधिक म्हणजेच ६५७ मृत्यू झाले आहेत.