पालिकेचे उत्पन्न कमी झालेले असले तरी विकासकामे आणि प्रकल्पांसाठी के ल्या जाणाऱ्या भांडवली तरतुदीत मात्र यंदा भरघोस वाढ करण्यात आली आहे. पुढील वर्षी फे ब्रुवारी २०२२ मध्ये पालिके च्या निवडणुका होणार असल्यामुळे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिन्या, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, सागरी किनारा प्रकल्प याकरिता भरघोस तरतूद करण्यात आली आहे. भांडवली तरतुदीत यंदा ७१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फे ब्रुवारी २०२२ मध्ये पालिके च्या निवडणुका आहेत. गेल्या किमान २५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे मुंबईकरांना खूश करण्यासाठी बहुतांशी प्रकल्प मार्गी लावण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून सोडण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षांत पालिके ने विकासकामांसाठी ११,७६४.६२ कोटींची तरतूद के ली होती. त्यापैकी डिसेंबपर्यंत के वळ ५७४४.७० कोटी म्हणजेच ४८ टक्के  निधी खर्च झाला होता. यंदा मात्र भांडवली खर्चासाठी तब्बल १८,७५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक तरतूद ही एका सागरी किनारा मार्गासाठी २००० कोटींची करण्यात आली आहे. त्याखालोखाल गोरेगाव-मुलुंड प्रकल्पासाठी १३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

विविध प्रकल्पांमुळे जे निवासी बाधित होतात ते आपले निवासस्थान सोडून दूर जायला तयार नसतात. त्यामुळे पालिकेचे अनेक प्रकल्प रखडलेले असतात. रस्ता रुंदीकरण, पर्जन्य जलवाहिन्या, नाला रुंदीकरणे, अशा पायाभूत प्रकल्पांना त्यामुळे विलंब होतो. त्यामुळे या प्रकल्पबाधितांना त्यांच्या पसंतीचा पर्याय देण्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी खात्याने निश्चित केलेल्या दराने नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. जे प्रकल्पबाधित दूर जाऊ इच्छित नाही त्यांना हा पर्याय देण्यात येईल. त्याकरिता पालिके ने १०० कोटींची तरतूद केली आहे. पालिके ने १६७५ कोटींची १२ पुलांची कामे हाती घेतली आहेत. तसेच नवीन पर्जन्य जलवाहिन्या पंपिंग स्टेशन, बोगद्यांची कामे आणि मुंबईमध्ये पुराच्या वेळी सामना करण्यासाठी मोठय़ा स्वरूपाची भांडवली कामे आगामी काळात हाती घेण्यात येणार आहेत.

गेल्या तीन वर्षांतील भांडवली खर्च

२०१७-१८ (प्रत्यक्ष खर्च)   ४९७८.४८ कोटी

२०१८-१९ (प्रत्यक्ष खर्च ) ५४३२.२४ कोटी

२०१९-२० (प्रत्यक्ष खर्च)   ७५६८.७० कोटी

२०२०-२१ सुधारित अंदाज १०,९०३ कोटी

२०२१-२२ (अर्थसंकल्पीय अंदाज)   १८,७५०.९९ कोटी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18750 crore for stalled projects abn
First published on: 04-02-2021 at 01:14 IST