अंधेरीतील सिप्झ भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या सहा महिलांना आज (मंगळवार) पहाटे भरधाव इंडिका गाडीने धडक दिली. त्यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला असून ४ जणी जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना पोलिसांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं आहे. मृत महिलांपैकी एकीचे वय ३६ तर एकीचे वय २२ वर्षे आहे.
सीप्झ परिसरातील गेट नंबर तीनजवळ हा अपघात झाला. आरोपी ड्रायव्हर प्रवीणकुमार कनौजियाला आरे कॉलनी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चालकाने दारूचे सेवन केले होते का याची चौकशी पोलिस करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
मुंबईत कार अपघातात २ महिला ठार, ४ जखमी
अंधेरीतील सिप्झ भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या सहा महिलांना आज (मंगळवार) पहाटे भरधाव इंडिका गाडीने धडक दिली. त्यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला असून ४ जणी जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना पोलिसांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं आहे. मृत महिलांपैकी एकीचे वय ३६ तर एकीचे वय २२ वर्षे आहे.
First published on: 22-01-2013 at 12:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 dead 4 injured in car accident