ठाण्यात ६ जणांकडून २५ बंदुका जप्त

ठाण्यात एका भाड्याच्या खोलीत राहणार्‍या ६ जणांकडून २५ बंदूकी जप्त करण्यात आल्या आहेत

ठाण्यात एका भाड्याच्या खोलीत राहणार्‍या ६ जणांकडून २५ बंदूकी जप्त करण्यात आल्या आहेत. (छायाः दीपक जोशी)

ठाण्यात एका भाड्याच्या खोलीत राहणार्‍या ६ जणांकडून २५ बंदूकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी ६ जणांना अटक केली असून त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कासारवडवली येथील एका खोलीवर ठाणे पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना खोलीत २५ बंदुका आढळल्या. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हे जम्मू काश्मिरमधील पूँछ जिल्ह्यात राहणारे आहेत. या आरोपींवर  बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
फोटो गॅलरीः ठाण्यात शस्त्रसाठा जप्त
जप्त केलेल्या बंदूकींपैकी २४ बंदूका या सिंगल बोअर प्रकारच्या तर १ बंदूक डबल बोअरची आहे. अटक केलेले सहाही आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून ठाण्यात भाड्याच्या खोलीत राहत असून त्यांच्याकडे बंदुकींचा परवानाही नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, हे आरोपी कोणत्याही दहशतावादी संघटनेशी संबंधित याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 25 firearm seized in thane