ख्रिसमस आणि नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईत २४ आणि ३१ डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. उत्पादन शुल्क विभागाकडून यासंबधीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले. परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे या काळात बनावट मद्याच्या पुरवठ्यावरही उत्पादन शुक्ल विभागाकडून नजर ठेवण्यात येणार आहे. दरवर्षी ३१ डिसेंबरच्या दिवशी बार आणि रेस्टॉरंटच्या वेळापत्रकावर मर्यादा घातल्या जातात. त्यानंतर बार संघटना कोर्टात जाऊन पहाटेपर्यंत बार सुरु ठेवण्याची परवानग्या मिळवतात. मात्र यंदा पहिल्यांदाच उत्पादन शुल्क विभागाकडून परिपत्रक काढून बार पहाटे पाचपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.