मुंबई: अमली पदार्थ नियंत्रण विभाग(एनसीबी) यांनी मुंबई व पुण्यात कारवाई करून सुमारे साडेचार किलो इफेड्रिन  या अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा ऑस्ट्रेलियात पाठवण्यात येणार होता. अटक आरोपी २७ जानेवारीपर्यंत एनसीबीच्या कोठडीत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनसीबीला यासंबंधी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील एका कुरियर कंपनीच्या कार्यालयात छापा टाकला. त्या वेळी महिलांसाठीच्या कपडय़ांच्या खोक्यात हा साठा लपवून ठेवल्याचे दिसून आले. तेथून तीन किलो ९५० ग्रॅम इफेड्रिन जप्त करण्यात आले आहे. हा साठा पुण्याहून मागवण्यात आला होता. तसेच तो ऑस्ट्रेलियाला पाठवला जाणार होता, असे तपासात समोर आले. या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू केला होता. या प्रकरणी पुण्यातील कर्वे नगर येथेही एनसीबीने छापा टाकून आणखी ४८५ ग्रॅम इफिड्रिन जप्त करण्यात आले आहे. दोन दिवस ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी दिव्येश प्रदीपभाई देसानी या तरुणाला अटक केली आहे. आरोपीचा या तस्करीत सहभाग असल्याचा संशय आहे. या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 and half 5 kg ephedrine seized in mumbai pune ncb akp
First published on: 24-01-2022 at 01:10 IST