एखाद्या विद्यार्थ्यांला रात्री उशीरा चांगला संगणकीय प्रोग्राम सुचला.. पण त्याच्याकडे लॅपटॉप किंवा संगणक उपलब्ध नसेल तर तो विद्यार्थी ती कल्पना तातडीने सिद्ध करु शकणार नाही. याचउलट त्याच्याच वर्गातील दुसरा विद्यार्थी केवळ त्याच्याकडे संगणक उपलब्ध आहे म्हणून पुढे जाऊ शकतो. म्हणजे शिक्षण क्षेत्रात सर्वाना समान संधी मिळत नाही. हीच संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकाकाडे लॅपटॉप उपलब्ध व्हावेत यासाठी आयआयटीने संशोधन करून स्वस्त लॅपटॉप तयार केले आहेत. हे लॅपटॉप विद्यार्थ्यांना अवघ्या ५८२० रुपयांना उपलब्ध होऊ शकणार आहेत.
आकाश टॅबलेटच्या घोषणेमुळे टॅबलेटच्या किंमती झपाटय़ाने कोसळल्या आणि आज बाजारात अगदी चार ते पाच हजारापासून टॅबलेट उपलब्ध होऊ लागले आहेत. पण हीच बाब लॅपटॉपच्या बाबतीत घडली नाही. यामुळेच स्वस्तात आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त लॅपटॉप उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू असलेल्या ‘नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी’ या कार्यक्रमांतर्गत आयआयटी मुंबईने हे संशोधन तडीस नेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रथम हा लॅपटॉप ओपनसोर्स सुविधेवर उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. मग लिनक्स या ऑपरेटिंग प्रणालीत काही बदल करून विशेष ऑपरेटिंग प्रणाली विकसित करण्यात आली असून त्यामध्ये सर्व ओपनसोर्स सॉफ्टवेअर वापरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लॅपटॉपला ‘फोसी लॅपटॉप’ असे नाव देण्यात आले असून तो केवळ शिक्षणासाठीच विकसित करण्यात आला आहे.
– प्रा. कन्नन मोडगलाय

फोसी लॅपटॉपचा तांत्रिक तपशील
* प्रोसेसर – १ गीगाहार्ट्झ डय़ुएल कोर एआरएम व्ही७
* रॅम – १ जीबी डीडीआर ३
* रॉम- ८ जीबी एनएएनडी
* एसडीकार्ड सपोर्ट – ३२ जीबीपर्यंत
* डाव्या आणि उजव्या क्लिकसह टचपॅड
* ब्लूटय़थ व्हर्जन -४
* ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
* ओपन जीएल ईएससाठी जीपीयू सपोर्ट
* दोन यूएसबी पोर्ट
* इथरनेट पोर्ट
* ऑडिओ आऊट आणि माइक जॅक
* ५००० एमएएचची बॅटरी
* शॉर्टसर्किट आणि ओव्हर चार्ज सुरक्षा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6000 laptops for common education
First published on: 03-07-2015 at 02:52 IST