तलाव क्षेत्राकडे पावसाची पाठ

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अगदी तुरळक पाऊस पडत असला तरी सातही तलावात मिळून सध्या ११ लाख ६६ हजार ६२३  दशलक्ष लिटर म्हणजेच ८०.६० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी दुपटीहून जास्त असला तरी तलाव क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे आणि तलाव क्षेत्रातही पावसाचा टिपूस पडत नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात १७ जुलैपर्यंत अगदीच कमी पाऊस पडला होता. त्यामुळे पाणीकपात करावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर पडलेल्या पावसामुळे तलावांतील जलसाठय़ात भरघोस वाढ झाली. गेल्या वर्षीपेक्षा चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. मातीतून झिरपत येणाऱ्या पाण्यामुळे पाणीसाठय़ात तुरळक वाढ होत असली तरी  गेल्या काही दिवसांपासून तलाव क्षेत्रातही पाऊस पडत नसल्यामुळे पाणी पातळी काही वाढत नाही.

मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करावा लागतो. सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असतात. तेव्हा एकू ण पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असतो. तलाव काठोकाठ भरलेले असतात तेव्हाच मुंबईला पूर्ण पाणीपुरवठा होऊ शकतो. तलावातील एकू ण पाणीसाठा हा ३१ जुलै पुरेल या दृष्टीने

त्याचे पालिके च्या जल

अभियंता खात्याद्वारे नियोजन केले जाते. त्यामुळे पुढील दीड महिन्यात पुरेसा पाऊस पडला नाही तर पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

९ ऑगस्ट २०२१ ११ लाख ६६ हजार ६२३ दशलक्ष लिटर   ८०.६०%

९ ऑगस्ट २०२० सात लाख ३१ हजार २८३ दशलक्ष लिटर   ५०.५३%

९ ऑगस्ट २०१९ १३ लाख २४ हजार सात दशलक्ष लिटर   ९१.४८%

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 80 percent water storage in lakes mumbai ssh
First published on: 10-08-2021 at 01:45 IST