व्यवस्थापन-कामगार संघटनांतील बैठक अयशस्वी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : बोनस-सानुग्रह अनुदानाच्या मागणीबाबत तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमधील बैठक अयशस्वी ठरल्याने ऐन दिवाळीच्या दिवशी १४ नोव्हेंबरला सकाळी ८ पासून राज्यातील ८६ हजार वीज कर्मचारी संपावर जातील, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीन कंपन्यांमध्ये ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी काम करतात. कामगार संघटनांचे प्रतिनिधी व ऊर्जा सचिव असिम गुप्ता, तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यात बोनसच्या मागणीबाबत गुरुवारी चर्चा झाली. २७ संघटनांनी पत्राद्वारे बोनस-सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी तिन्ही कंपन्यांनी मिळून राज्यातील सर्व वीज कर्मचाऱ्यांना १२० कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी के ली.

करोनाच्या टाळेबंदीमुळे यंदा वीजविक्रीतून मिळणारा महसूल घटला असल्याने सद्य:स्थितीत ही रक्कम देता येणार नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट के ले. त्यामुळे १४ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून संप करण्याचा निर्णय कामगार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला असून गुरुवारपासून राज्यभर निदर्शने सुरू झाली. वीज कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक सेवेंतर्गत येत असल्याने राज्यातील ग्राहकांचा वीजपुरवठा संपामुळे खंडित होऊ नये यासाठी मेस्मा लावला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 86000 power workers likely to go on strike from diwali zws
First published on: 13-11-2020 at 04:09 IST