मध्य रेल्वेचा निर्णय; पश्चिम रेल्वेच्या १२८ डब्यांबाबत मात्र अद्याप निर्णय नाही

मुंबई : करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने एक्स्प्रेसच्या डब्यांमध्येच सुसज्ज असे विलगीकरण कक्ष तयार के ले. मात्र गेल्या वर्षभरात या डब्यांचा वापरच झाला नाही. अखेर या विलगीकरण कक्षांचे पुन्हा एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२८ पैकी ८८ डबे पुन्हा एक्स्प्रेस डब्यात रूपांतरित करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील १२८ विलगीकरण डबे त्याच स्थितीत असून त्याबाबत योग्य निर्णय घेण्यासंदर्भात राज्य सरकार व रेल्वे बोर्डाशीही पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात करोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांची संख्या वाढू लागली आणि त्यानंतर करोनाबाधितांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. खाटा नसल्याने रुग्णांवर तात्पुरते घरीच उपचार के ले जात होते. तसेच रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णांची प्रतीक्षायादीवरील संख्या वाढतच होती. करोनाबाधितांची संख्या वाढल्यास सरकारी व खासगी रुग्णालयांवर पडणारा ताण लक्षात घेता त्यांच्यावर त्वरित उपचार व्हावे म्हणून रेल्वे डब्यांचे विलगीकरण डब्यांत रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने मार्च २०२०च्या अखेरीस घेतला होता. त्यानुसार मध्य रेल्वेच्या  मुंबई विभागाकडून १२८ विलगीरकरण डब्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्मितीचे काम परळ, माटुंगा कार्यशाळेबरोबरच वाडीबंदर कारखान्याने के ले. निर्मिती के ल्यानंतरही या डब्यांचा वापरच झाला नाही. अखेर विलगीकरण डबे पडून राहिल्याने मध्य रेल्वेने त्यांचे प्रवाशांसाठी एक्स्प्रेस डब्यांत रूपांतर करण्यास सुरुवात के ली. रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारला याची कल्पना देऊन व मंजुरी घेऊन ते डबे एक्स्प्रेस डब्यात रूपांतरित करण्यात आले.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एकू ण १२८ डब्यांपैकी ४० डबे विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहेत. तर गरजेनुसार ८८ डब्यांचे मेल-एक्स्प्रेस डब्यात रूपांतर के ले. यात इगतपुरी येथे २० आणि आपटे स्थानकाजवळ २० विलगीकरण डबे उभे आहेत.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानेही विलगीकरणासाठी १२८ डबे तयार ठेवले होते. हे डबे विरार, पालघर इत्यादी ठिकाणी उभे असून ते पुन्हा सामान्य डब्यात रूपांतरित करण्याबाबत निर्णय झालेला नाही. करोनाबाधित रुग्णसंख्या कमी झाल्याने याबाबत राज्य सरकारशीही चर्चा के ल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकू र यांनी सांगितले.

विविध सुविधा

रेल्वेच्या एका डब्यात १६ खाटा आणि वैद्यकीय उपकरणे, रक्तपुरवठा, प्राणवायूची सुविध, व्हेंटिलेटर, प्रसाधनगृहाची व्यवस्था, तसेच, डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.