९५ वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत बेळगाव येथे होणार आहे. संगीत व गद्य नाटक, संगीत मैफल, बालनाटय़, मुक्त रंगमंच असे विविध कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ रंगकर्मीच्या भूमिकांना उजाळा देणारा चित्ररथ हे संमेलनानिमित्त काढण्यात येणाऱ्या नाटय़दिंडीचे खास आकर्षण असणार आहे.
मुंबईत शुक्रवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्षा लता नार्वेकर यांनी नाटय़ संमेलनाविषयी सविस्तर माहिती दिली.
मुख्य संमेलनाच्या अगोदर म्हणजे १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमही होणार असून त्याची जबाबदारी नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेकडे सोपविण्यात आली आहे. तीन नाटके, एक संगीतविषयक कार्यक्रम आणि अन्य स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनात सीमा प्रश्नाचा ठराव घ्यायचा किंवा नाही या वादावरून बेळगाव नाटय़ संमेलनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र निर्माण झालेला सर्व वाद आता निवळला असून सगळ्यांचे सहकार्य संमेलनासाठी मिळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाटय़दिंडीत विविध चित्ररथांचा समावेश
संमेलनाचे कार्यक्रम मुख्य व्यासपीठ (रंगमंच) आणि तीन नाटय़गृहात होणार आहेत. नाटय़ संमेलनात ‘मुक्त रंगमंच’ उभारण्यात येणार असून त्यावरही विविध कलावंत एकपात्री कार्यक्रम सादर करणार आहेत. नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने बेळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन नाटय़दिंडी काढण्यात येणार आहे. नाटय़ कलावंतांसह विविध चित्ररथ दिंडीत असणार आहेत. ज्येष्ठ रंगकर्म्ीच्या भूमिकांच्या आठवणींना उजाळा देणारा
विशेष चित्ररथासह ३०० वारकरी, सजविलेल्या बग्गी, घोडेस्वार, पालख्या यांचा दिंडीत समावेश आहे. नाटय़ संमेलनाच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 95th natya sammelan to be held in belgaum
First published on: 11-01-2015 at 03:34 IST