scorecardresearch

Premium

वांद्रे – जोगेश्वरी परिसरात अपुरा पाणीपुरवठा; मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली

जलवाहिनी दुरुस्तीच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले असून ते युद्धपातळीवर सुरू आहे.

main water aqueduct burst Seepz Gate Andheri metro project low pressure water supply Bandra-Jogeshwari area mumbai
वांद्रे – जोगेश्वरी परिसरात अपुरा पाणीपुरवठा; मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई: मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे गुरुवारी रात्री अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. मुंबई महानगरपालिकेने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. यामुळे वांद्रे – जोगेश्वरी परिसरात शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. परिणामी, नागरिकांचे हाल झाले.

वेरावली ३ जलाशयाच्या १८०० मी. मी. व्यासाच्या दोन इनलेटपैकी एक इनलेट मुख्य जलवाहिनीला अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ गुरुवार, ३० नोव्हेंबर २०२४ रोजी धक्का लागला व गळती सुरू झाली. जलवाहिनी दुरुस्तीच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले असून ते युद्धपातळीवर सुरू आहे.

water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
Gondia, Tragic Accident, Car Veers, Canal, Three Killed, Pangaon, Salekasa,
गोंदिया : भाविकांची अनियंत्रित कार कालव्यात कोसळली; तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू
Improper planning of flyover construction in North Nagpur objection of North Nagpur Senior Citizen Forum
“उत्तर नागपुरातील उड्डाण पूल बांधकामाचे चुकीचे नियोजन,” नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरमचा आक्षेप

हेही वाचा… चाळीस कोटींपेक्षा जास्त किंमत असूनही घरांना मागणी! जाणून घ्या खरेदी करणारे कोण…

यामुळे शुक्रवार, १ डिसेंबर रोजी सकाळी, एच पूर्व विभागातील सांताक्रुझ पूर्व (वाकोला, प्रभात कॉलनी इत्यादी), एच पश्चिम विभागातील सांताक्रूझ पश्चिम, खार पश्चिम, वांद्रा पश्चिम व के पश्चिम विभागातील अंधेरी पश्चिम (चार बंगला, जुहू कोळीवाडा, एस व्ही रोड इत्यादी) येथे कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A main water aqueduct burst near seepz gate at andheri during the metro project due to this there was low pressure water supply in the bandra jogeshwari area mumbai print news dvr

First published on: 01-12-2023 at 10:50 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×