कडेकोट सुरक्षेतून पळून जाण्यास कुख्यात गुंड अबू सालेम काही अतिमानव नाही, असे टोला हाणत त्याला बेडय़ा घालून न्यायालयात आणू नये, असे आदेश विशेष ‘टाडा’ न्यायालयाने बुधवारी पोलिसांना दिले.
सालेम पळून जाण्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याचे सांगत त्याला न्यायालयात बेडय़ा घालून आणले जाते. त्याला विरोध करणारा अर्ज सालेमने केला असून विशेष न्यायालयाने त्याच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांनी पोलिसांना सालेमविरुद्ध चालविण्यात येणाऱ्या खटल्यातही म्हणावे तसे सहकार्य करीत नसल्याबाबत यापूर्वी फटकारले होते. तसेच न्यायालयाने गुप्तचर विभागाने सालेम पळून जाण्याच्या शक्यतेबाबत दिलेल्या माहितीविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर अशी भीती व्यक्त केली असेल तर ती लिखित स्वरूपात का नाही, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर सालेम सात वर्षे फरारी होता आणि तो पळून जाण्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच आधारे त्याला बेडय़ा घालून न्यायालयात आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर पोलिसांचे म्हणणे फेटाळत सालेमची मागणी मान्य केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abu salem not superhuman not to be handcuffed tada court says
First published on: 06-03-2014 at 06:19 IST