पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांची दुरुस्ती करण्यात अपयशी ठरलेल्या अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे रस्ते विभागाचे प्रमुख अभियंते गिरधारीलाल अग्रवाल यांना आपल्या पदापासून मुकावे लागले आहे. त्यांच्या जागी बांधकाम प्रस्ताव विभागाच्या पूर्व उपनगराच्या उपप्रमुख अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात अपयशी ठरलेल्या रस्ते विभागातील अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे पालिकेत प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. अभियंत्यांवरील कारवाई मागे घेण्यात यावी यासाठी राजकीय नेत्यांकडून प्रशासनावर दबाव टाकण्यात येत होता. दंड वसुलीपूर्वी अभियंत्यांची गिरधारीलाल अग्रवाल यांच्या पुढे त्यांची सुनावणी करण्यात येणार होती. अभियंत्यांनी या सुनावणीला प्रखर विरोध दर्शविला होता. त्यामुळेच अग्रवाल यांची बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.आता रस्ते विभागाच्या मुख्य अभियंतापदी बांधकाम प्रस्ताव विभागाच्या पूर्व उपनगराचे उपप्रमुख अभियंता डी. दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2012 रोजी प्रकाशित
खड्डेप्रकरणी अभियंत्यांवरील कारवाई प्रमुख अभियंत्यास भोवली
पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांची दुरुस्ती करण्यात अपयशी ठरलेल्या अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे रस्ते विभागाचे प्रमुख अभियंते गिरधारीलाल अग्रवाल यांना आपल्या पदापासून मुकावे लागले आहे.
First published on: 02-12-2012 at 02:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against engineer on pathhole issue created problem to chief engineer