विरारमध्ये राहणारे बाळासाहेबांचे समवयस्क व चाहते असलेले मधुकर गोपाळ दळवी (८४) यांचे रविवारी संध्याकाळी बाळासाहेबांचा अंत्यविधी दूरचित्रवाणीवरुन पाहत असताना हृदयविकाराचा झटका येऊन आकस्मिक निधन झाले. मराठी, नाटय़-चित्रपटसृष्टीतील अभिनेते चेतन दळवी यांचे ते वडील होते.
मधूकर दळवी पूर्वी रेल्वेत नोकरीवर असताना दादर येथे वास्तव्यास होते. बाळासाहेबांना प्रत्यक्ष पाहिलेले, त्यांची आंदोलने जवळून अनुभवलेले मधुकर दळवी हे आता पत्नीसमवेत विरार येथील सदनिकेत राहत होते. बाळासाहेबांच्या निधनाचे त्यांना अतीव दु:ख झाले. त्यांची अंत्ययात्रा संपूर्णपणे दूरचित्रवाणीवर पाहिली आणि अंत्यसंस्कार पाहत असताना त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि ते मृत्यू पावले. त्यांच्या पार्थिवावर महापौर राजीव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
अभिनेते चेतन दळवी यांना पितृशोक
विरारमध्ये राहणारे बाळासाहेबांचे समवयस्क व चाहते असलेले मधुकर गोपाळ दळवी (८४) यांचे रविवारी संध्याकाळी बाळासाहेबांचा अंत्यविधी दूरचित्रवाणीवरुन पाहत असताना हृदयविकाराचा झटका येऊन आकस्मिक निधन झाले. मराठी, नाटय़-चित्रपटसृष्टीतील अभिनेते चेतन दळवी यांचे ते वडील होते.
First published on: 20-11-2012 at 04:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor chetan dalvis father expired