मुंबई : ‘स्पेशल ऑप्स’ या ‘डिस्ने हॉटस्टार’वरील लोकप्रिय वेबमालिके सह अनेक चांगल्या चित्रपट आणि मालिकांचा भाग असलेले अभिनेते मेजर विक्रमजीत कं वरपाल यांचे करोनामुळे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांत आपल्या छोटेखानी चरित्र भूमिकांमधून त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर २००३ साली मेजर विक्रमजीत यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘पेज ३’, ‘रॉके टसिंग : सेल्समन ऑफ द इअर’, ‘आरक्षण’, ‘टु स्टेट्स’, ‘द गाझी अटॅक’ अशा चित्रपटांमधून त्यांनी भूमिका के ल्या होत्या.  त्यांनी ‘दिया और बाती हम’, ‘ये है चाहतें’, ‘दिल ही तो है’ आणि ‘२४’ या मालिकांमधूनही काम के ले होते. ‘डिस्ने हॉटस्टार’वरील ‘स्पेशल ऑप्स’ ही त्यांची प्रदर्शित झालेली अखेरची वेबमालिका. अत्यंत कमी वेळात अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी आपली ओळख निर्माण के ली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor major vikramjit kanwarpal passes away akp
First published on: 02-05-2021 at 01:20 IST