मुंबई : गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा गंधार पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना जाहीर झाला असून मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पिळगावकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. बालदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वा. हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
आजवर ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे यांना गंधार बालनाट्य संस्थेचा पुरस्कार देत गौरवण्यात आले आहे. गंधार ही संस्था सातत्याने अनेक उपक्रम राबवत असते. मे महिन्यात गंधार संस्थेतर्फे विविध जिल्ह्यात बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राभरातून प्रवेश आले होते.