काँग्रेसचे माजी आमदार आणि ‘आदर्श’ घोटाळ्यातील आरोपी कन्हैयालाल गिडवाणी यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे शुक्रवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. गिडवाणी यांना डॉक्टरांच्या देखभालीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गिडवाणी हे ‘आदर्श’ सोसायटीचे प्रवर्तक असून घोटाळ्याप्रकरणी त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाने अटकही केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2012 रोजी प्रकाशित
‘आदर्श’ घोटाळ्यातील आरोपी कन्हैयालाल गिडवाणी रुग्णालयात दाखल
काँग्रेसचे माजी आमदार आणि ‘आदर्श’ घोटाळ्यातील आरोपी कन्हैयालाल गिडवाणी यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे शुक्रवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.
First published on: 25-11-2012 at 03:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adarsh scam kanhaiyalal gidwani hospitalised