२००२ मधील ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणी पुनर्सुनावणीबाबत न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावर अभिनेता सलमान खान याने सत्र न्यायालयात केलेल्या याचिकेवर सोमवारी निकाल देण्यात येणार आहे.
सलमान याने मद्याच्या नशेत भरधाव गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या काही जणांना चिरडले होते. या प्रकरणी महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी १७ साक्षीदार तपासल्यावर सलमान खान याने जाणीवपूर्वक हा गुन्हा केला असल्याचे मत प्रदर्शित करून हा खटला पुन्हा सत्र न्यायालयात चालविण्यात यावा असा निकाल दिला होता. या निकालास सलमान खान याने आव्हान देणारी याचिका दाकल केली होती. या याचिकेवर सोमवारी सत्र न्यायालयाचे न्या. यू. बी. हेजीब निकाल देणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2013 रोजी प्रकाशित
सलमानच्या याचिकेवर उद्या निकाल
२००२ मधील ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणी पुनर्सुनावणीबाबत न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावर अभिनेता सलमान खान याने सत्र न्यायालयात केलेल्या याचिकेवर सोमवारी निकाल देण्यात येणार आहे. सलमान याने मद्याच्या नशेत भरधाव गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या काही जणांना चिरडले होते.
First published on: 09-06-2013 at 04:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adjudication on the appeal of salman today