मुंबई : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी, नियोजनाबाबत सल्ला देण्यासाठी दीपक करंजीकर यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या सल्लागार समितीमध्ये आशा खाडिलकर, पं. राम देशपांडे, सोनिया परचुरे, मिलिंद रायकर, पल्लवी जोशी – अग्निहोत्री, श्वेता परुळेकर, अक्षय इंडिकर, संपदा जोगळेकर – कुलकर्णी, डॉ. शिरीष ठाकूर, विनय येडेकर, विघ्नेश जोशी, शैलेश चव्हाण, विजय बोधनकर, विजय कदम, मोहन बने आणि मकरंद मुळे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर सदस्य सचिव म्हणून अकादमीचे प्रकल्प संचालक काम पाहणार असून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशानुसार या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची मुदत निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षांसाठी अथवा समितीची पुनर्रचना यापैकी जो आधीचा कालावधी असेल, तोपर्यंत असेल.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
indira gandhi tried to end democracy says devendra fadnavis
इंदिरा गांधींकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस यांची टीका