तस्करीतील सोने विमानतळाबाहेर काढण्याच्या प्रयत्नात असलेला एअर इंडियाचा वरिष्ठ अधीक्षक व सेवा अभियंता जनार्दन कोंडविलकर याला हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) मंगळवारी मध्यरात्री अटक केली. कोंडविलकरच्या झडतीत ४४ लाख रुपये किमतीचे १६४९ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोंडविलकरच्या संशयास्पद हालचालींवर काही दिवसांपासून एआययू अधिकाऱ्यांचे लक्ष होते.  विमानातून प्रवास करणाऱ्या तस्कराने मागे सोडलेले सोने विमानतळाबाहेर काढण्याची जबाबदारी कोंडविलकर सराईतपणे पार पडत असावा, असा संशय आहे.

सोने घेण्यासाठी विजय रावल नावाचा तरुण विमानतळाबाहेर कोंडविलकरची वाट बघत असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार रावललाही अटक करण्यात आली. विमानतळावर एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आत-बाहेर करण्यासाठी वेगळे मार्ग आहेत. नेहमीची ये-जा असल्याने त्यांची झाडाझडती अनेकदा होत नाही. तोच फायदा घेत सोने तस्करांनी कमिशन देऊन अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या जाळय़ात ओढले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india official involved in gold smuggling
First published on: 16-11-2017 at 03:54 IST