भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज (१९ नोव्हेंबर) जयंती आहे. या निमित्ताने अनेक राजकीय नेते इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाचं कौतूक करत अभिवादन करत आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनीही इंदिरा गांधींना अभिवादन केलं. तसेच त्यांच्या झंझावाती राजकीय प्रवासावर भाष्य केलं. त्यांनी रविवारी (१९ नोव्हेंबर) एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे.

अजित पवार म्हणाले, “भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. त्यांचा झंझावाती राजकीय प्रवास तरुणांना प्रेरणा देतो, बळ देतो.”

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Jayant Patil On Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बारामतीकर त्याच पद्धतीने…”
Sharad Pawar
कच्चथिवू बेटावरून शरद पवारांचा मोदींवर पलटवार, म्हणाले, “हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर…”

प्रफुल पटेल यांनीही इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्ताने पोस्ट केली. ते म्हणाले, “भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांचं स्मरण करतो.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही पोस्ट करत इंदिरा गांधींना अभिवादन केलं. ते म्हणाले, “मी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. त्यांचं देशासाठी योगदान आणि बलिदान स्मरण करतो.”