उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अमृता फडणवीसांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करून ब्लॅकमेल करण्यात येत होतं, असा आरोप अमृता फडणवीसांनी तक्रारीत केला.

अमृता फडणवीसांनी आज सकाळी मलबार हिल पोलीस ठाण्यात डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी अनिक्षा आणि अनिल हे दोघेही अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करत होते. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देताच मलबार हिल पोलीस अनिल जयसिंघानी यांच्या उल्हासनगर येथील घरी पोहोचले.

पोलिसांनी अनिक्षाची अपार्टमेंटमध्ये सुमारे सहा तास चौकशी केली. या चौकशीनंतर मलबार हिल पोलिसांनी अनिक्षाला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

FIR मध्ये काय म्हटलं आहे?

संशयित आरोपी अनिक्षा सुमारे १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. तसेच ती अमृता फडणवीस यांच्या घरीही गेली होती. अनिक्षा आणि माझी पहिली भेट नोव्हेंबर २०२१ मध्ये झाल्याचं अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटलं आहे.