मुंबई : प्रशासकीय सेवेत दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मानले जाणाऱ्या गृह सचिवपदी आनंद लिमये यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच राज्य शासनाने नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

मनुकुमार श्रीवास्तव यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने गृह सचिवपद हे रिक्त होते. या जागी सामान्य प्रशासन विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव व १९८९च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आनंद लिमये यांची बदली करण्यात आली आहे.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

डॉ. संजय चहांदे यांची सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली. मेअखेर निवृत्त होणाऱ्या डॉ. चहांदे यांना तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नियुक्ती मिळाली आहे. शाम तागडे यांची गृह विभागात अपिल सचिव, आभा शुक्ला यांची सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात  आली.

डी. गंगाथरन यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अमित सैनी (मुख्य सचिव कार्यालय), राहुल द्विवेदी (सहआयुक्त विक्रीकर विभाग ), विवेक भीमनवार व्यवस्थापकीय संचालक, फलोत्पादन विभाग पदावर बदली करण्यात आली.