Anant-Radhika Wedding: देशातले बडे उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानींचा (Anant Ambani) विवाह सोहळा मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड (GIO World) या ठिकाणी शनिवारी पार पडला. या विवाह सोहळ्यात बॉलिवूडच्या तारे तारका (Bollywood Stars) विविध राजकीय नेते, उद्योजक या सगळ्यांची उपस्थिती होती. राधिका मर्चंट (Radhika Merchant) आणि अनंत अंबानी या दोघांचा हा विवाह सोहळा शाही हा शब्द फिका पडेल इतका देखण्या स्वरुपात झाला. याच लग्नात दोन संशयित घुसले होते. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनंत अंबानींच्या लग्नात दोन संशयित घुसले (Two Person in Anant Ambani Wedding)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनंत राधिकाच्या लग्नात (Anant Ambani Radhika Wedding) दोन संशयित घुसले होते. लुकमान मोहम्मद शफी शेख (Luqmann Mohammad Shafi Shaikh) आणि व्यंकटेश नरसैय्या अलुरी (Venktesh Narsaiah Aluri) अशी या दोन संशयितांची नावं आहेत. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुकमान मोहम्मद शफी शेख हा आंध्र प्रदेशातील युट्यूबर आहे, त्याने आपण निमंत्रण नसताना सोहळ्यात शिरलो हे मान्य केलं आहे.

हे पण वाचा- Video : अनंत – राधिकाचा लग्नानंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर, जोडीने पाया पडत घेतले पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद

Anant Ambani and Radhika Merchant Wedding cost
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा खर्च किती?

नेमकं काय घडलं?

लुकमान आणि व्यंकटेश या दोघांनीही जिओ वर्ल्ड सेंटर या ठिकाणी विना परवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकलं. या दोघांकडेही निमंत्रण पत्रिका नव्हती. तसंच लग्न सोहळ्यासाठी जो विशिष्ट बॅज प्रत्येकाला देण्यात आला होता तो देखील नव्हता. या दोघांनाही विचारणा केली असता लुकमानने हे सांगितले की, मला हा शाही विवाह सोहळा माझ्या डोळ्यांनी बघायचा होता. तर व्यंकटेश याने सांगितलं की तो देखील एक युट्यूबर आहे. त्याला हा विवाह सोहळा कॅमेरात कैद करुन स्वतःच्या युट्यूब चॅनलवरुन प्रसारित करायचा होता. मात्र हे दोघंही निमंत्रण नसताना आल्याने पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला शाही विवाह सोहळा

अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवशी देशातले मोठमोठे कलाकार, बडे उद्योजक, राजकारणी आले होते. त्यामुळे या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. तरीही सुरक्षेचं कडं तोडून लुकमान आणि व्यंकटेश या दोघांनी विवाह सोहळ्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांना ही बाब वेळीच समजल्यामुळे या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांकडून या दोघांची चौकशी सुरु आहे.