मुंबई : अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने (एएनसी) गोरेगाव येथे रविवारी केलेल्या कारवाई मेफ्रेडॉन (एमडी) या अमलीपदार्थासह परदेशी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली. दोघांकडून सव्वाआठ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. बाबिरे ग्रेस (२८) व अफजल अजमिया सय्यद (४९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ८२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून त्याची किंमत आठ लाख २० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाबिरे ग्रेस ही मूळची युगांडा येथील रहिवासी आहे. सध्या ती नालासोपारा येते वास्तव्याला होती.

मुंबईतील उपनगरात एक परदेशी महिला अमलीपदार्थ विक्रीत सक्रिय असल्याची माहिती घाटकोपर एएनसीला मिळाली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पोलीस पथकाने गोरेगाव येथील दूधसागर सोसायटी बस थांब्याजवळ सापळा रचला होता. त्यानुसार ग्रेस व सय्यद दोघे एमडी विक्रीसाठी तेथे आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी ग्रेसकडे ३० ग्रॅम व सय्यदकडे ५२ ग्रॅम एमडी सापडले.

Ministry of Railways has Released f frequently asked questions for RPF Constable Vacancy 2024 Must Read
RPF Recruitment 2024: ‘आरपीएफ’मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी महाभरती; अर्ज करताना खाते कसे उघडावे? पाहा डिटेल्स
virar Sand Mafia, Sand Mafia active
वसई विरार : खाडी किनारी वाळू माफिया सक्रिय, भरारी पथकाची कारवाई, ४ बोटी केल्या नष्ट
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
EVM and VV Pat Controversy Occurs Frequently
विश्लेषण : ईव्हीएममध्ये नोंदलेल्या प्रत्येक मताची पडताळणी शक्य आहे का? ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट वाद वारंवार का उद्भवतो?