गावदेवी येथे नाकाबंदीत सापडलेल्या बीएमडब्ल्यू गाडीतील व्यावसायिकाने सोमवारी पहाटे पोलिसांना न जुमानता गाडी भरधाव वेगाने पुढे नेताना एका गाडीला दिलेल्या धडकेचा फटका बसून दोन पोलीस शिपाई जखमी झाले. पोलिसांनी पाठलाग करून ब्रीच कँडी येथे मद्यधुंद अवस्थेतील पुण्यातील व्यावसायिकाला अटक केली.
संगणकाच्या सुट्टय़ा भागांचा व्यवसाय करणारा अनिल राऊत हा २८ वर्षे वयाचा तरुण ही गाडी चालवित होती. त्याची मैत्रिण त्यावेळी त्याच्या सोबत होती. जुहू येथील एका हॉटेलात जेवण केल्यानंतर ते नरिमन पॉइंटच्या दिशेने आले. तेथून ते पुण्याला परतत असताना पहाटे पावणेदोनच्या सुमारास गावदेवी पोलिसांनी नाकाबंदी केली. नाकाबंदीत ही गाडी अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु न थांबता गाडी भरधाव वेगाने नेली. वाटेतील गाडीला धडक दिल्याने शामसुंदर निकम आणि मधुकर शिंगाडे हे बंदोबस्तावरील दोन पोलीस शिपाई जखमी झाले.
या दोघांना बॉम्बे इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना जाऊ देण्यात आले. धडक दिल्यानंतर पळून गेलेल्या व्यावसायिकाने ब्रीच कँडी समोरील एका गल्लीत गाडी उभी केली. परंतु पाठलागवर असलेल्या बीट मार्शल पोलिसांनी ही गाडी ओळखली आणि व्यावसायिकाला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2013 रोजी प्रकाशित
पोलिसांना उडवून पळणाऱ्याला अटक
गावदेवी येथे नाकाबंदीत सापडलेल्या बीएमडब्ल्यू गाडीतील व्यावसायिकाने सोमवारी पहाटे पोलिसांना न जुमानता गाडी भरधाव वेगाने पुढे नेताना एका गाडीला दिलेल्या धडकेचा फटका बसून दोन पोलीस शिपाई जखमी झाले. पोलिसांनी पाठलाग करून ब्रीच कँडी येथे मद्यधुंद अवस्थेतील पुण्यातील व्यावसायिकाला अटक केली.
First published on: 09-04-2013 at 04:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrested the person who trying to run away after hiting police