मुंबई  : शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खान हा तिकीट काढून क्रूझ पार्टीला गेला नव्हता. तर भाजप नेते मनोज कंबोज यांच्या मेव्हण्याने त्याला तेथे नेले होते. शाहरुखकडून खंडणी वसुलीसाठीच अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी समीर वानखेडे आणि कंबोज यांनी हा कट के ल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी के ला. तसेच वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनीही त्या पार्टीत उपस्थित राहावे म्हणून त्यांनाही निमंत्रण देण्यात आले होते, पण शेख फिरकले नाहीत, असा दावाही त्यांनी के ला. भाजपचे कंबोज यांनी सारे आरोप फे टाळून लावले.

नवाब मलिक यांनी नव्या आरोपांच्या मालिकेत भाजपचे मनोज कंबोज यांना लक्ष्य केले.

 कंबोज आणि समीर वानखेडे यांची हातमिळवणी असून, मुंबईत खंडणी वसुलीचे मोठे रॅके ट या दोघांकडून चालविले जाते, असा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत के ला. मनोज कंबोज  यांच्या मेव्हण्याने आर्यन खानला पार्टीचे निमंत्रण दिले. तो तिकीट खरेदी करून क्रू झ पार्टीला गेला नव्हता. आर्यनचे अपहरण करून खंडणी वसुली करण्याचा समीर वानखेडे, मनोज कंबोज यांचा तो कट होता.

आर्यनला पकडण्यात आल्यावर २५ कोटींची मागणी करण्यात आली. १८ कोटींचा व्यवहार ठरला. यापैकी ५० लाख रुपये वसूलही करण्यात आले होते, परंतु आर्यन खान आणि गोवासीचा फोटो समोर आल्यानेच त्यांचे कारस्थान उघड झाल्याचा आरोपही मलिक यांनी केला.

कंबोज यांनी आरोप फेटाळले

नवाब मलिक यांनी के लेले सारे आरोप भाजपच्या मनोज कंबोज यांनी फे टाळून लावले. जावयाला अटक के ल्यानेच नवाब मलिक हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोटेनाटे आरोप करीत आहेत. अमली पदार्थाचे व्यवहार व सेवनात राष्ट्रवादीचे नेते व त्यांची मुले  सहभागी असल्याचा आरोपही कंबोज यांनी के ला.

अस्लम शेख यांनाही निमंत्रण

त्या वादग्रस्त क्रू झ पार्टीचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. पण त्यांनी पार्टीला जाण्यास नकार दिला. बडय़ा व्यक्तींना निमंत्रण देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची हाच वानखेडे आणि त्यांच्या मित्रांचा धंदा आहे. वानखेडे यांचे सारे मित्र हे भाजपशी संबंधित आहेत, असा आरोपही मलिक यांनी के ला.

वानखेडे यांच्या वडिलांचा मलिक यांच्याविरोधात दावा

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी उच्च न्यायालयात धाव घेत  मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात १.२५ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने के लेल्या कारवाईवर मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. शिवाय वानखेडे यांचे कुटुंब घोटाळेबाज असल्याचा आरोप करत ते हिंदू नसल्याचा दावाही केला होता.

सुनील पाटील पोलीस ठाण्यात

भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर आरोप केले होते.  पाटील रविवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हे सूत्रधार असल्याचा आरोप कंबोज यांनी केला होता. पाटील यांची पाच तास चौकशी करण्यात आली. समीर वानखेडे यांच्याशी कधीही संपर्क झाला नाही, असे स्पष्टीकरण  पाटील यांनी दिले.