मुंबई: कुटुंब नियोजनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी देण्यात आलेल्या नव्या संचाचा वापर करण्यास आशासेविकांनी नकार दिला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशासेविकांवर ग्रामीण भागांमध्ये कुटुंब नियोजनाचा प्रचार करण्याच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आत्तापर्यंत या सेविकांना माहिती देण्यासाठी विविध चित्रांचे तक्ते देण्यात आले होते. त्याचा वापर करून कुटुंब नियोजनासाठी कोणती सुरक्षित साधने उपलब्ध आहेत आणि याचा वापर कसा करावा याची माहिती नवविवाहित जोडप्यांना देण्यात येत असे. आरोग्य विभागाने कुटुंब नियोजनाची माहिती देण्यासाठी नवे संच आशासेविकांना दिले असून यात रबरी लिंगाचा समावेश आहे. त्याच वापर करून माहिती देणे आशासेविकांना लाजिरवाणे वाटत असून त्यांनी त्याद्वारे समुदेशन करण्यास विरोध केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha workers refuse counseling on family planning zws
First published on: 29-03-2022 at 03:52 IST