मुंबई दौऱ्यावर असताना बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता. यावरून मुंबई महापालिकेचे हजारो कोटींच्या ठेवी या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ठेवता आल्या आहेत, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान मोदी यांना दिलं. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली, असं ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “ज्यांना स्वत:च्या आयुष्यात, कुटुंबात, पक्षात आणि सरकारमध्ये सलग अपयश आलं त्यांनी…” उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांकडून प्रत्युत्तर!

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
minister mangal prabhat lodha pay tribute to ramnath goenka
रामनाथ गोएंका यांना आदरांजली
sangli lok sabha seat, nana patole, sanjay raut, congress, shivsena uddhav thackarey, lok sabha 2024, election 2024, maha vikas aghadi, conflict in maha vikas aghadi, maharashtra politics, maharashtra news, marathi news, sangli news, election news,
“संजय राऊत यांनी नाटके बंद करावी,” नाना पटोले यांचा सल्ला; म्हणाले, “त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये…”
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

“उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली. मी शेठजी यासाठी म्हणतो, की त्यांनी धनडांगग्या शेठजींसाठी कामं केली. त्यांनी बिल्डर, ठेकेदार, डिस्को, पब, बार या सर्वांना त्यांनी सुट दिली. मनपाच्या ठेवींबाबत बोलताना तेच म्हणाले की हे ठेकेदारांचे पैसे आहेत. आजही ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेल्या दरोड्यांपासून मुंबई महापालिका वाचवणं महत्त्वाचं आहे. यासाठी भाजपा मुंबईकरांबरोबर आहे”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली

हेही वाचा – “मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार”, राज ठाकरे म्हणाले, “तैलचित्राच्या अनावरणाला उपस्थित नसलेले अनेकजण…”

“उद्धव ठाकरे एक अपयशी नेता”

“उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केलेला वैचारीक स्वैराचार इतिहासात नोंदवला जाईल, असा आहे. त्यामुळे वैचारीक स्वैराचारचे कृत्य म्हणजे उद्धव ठाकरेंच राजकीय जीवन आहे. मला व्यक्तीगत टीका करायची नव्हती. मात्र, त्यांनी काल आमचे बापजादे काढले, म्हणून आज बोलावं लागतं आहे. उद्धव ठाकरे एक अपयशी नेते आहेत. उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू त्यांच्यापासून दूर झाले. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी सुद्धा त्यांना नाकारलं. त्यामुळे कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर ते अपयशी ठरले आहेत. अशा अपयशी व्यक्तीच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, याचा विचार करायला हवा. गेल्या २५ वर्षात या दरोडेखोरांनी २२ हजार कोटी खर्च केले, ते काय स्वत:च्या खिशातून खर्च केले का? त्यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर दरोडा टाकला आणि मुंबईकरांना सेवा सुद्धा दिल्या नाहीत ”, असा आरोपही शेलार यांनी केला.