स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण आज करण्यात आले. यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषण करत स्व. बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. स्व. बाळासाहेबांच्या नावाच्या अगोदर जवळपास तीन ते सव्वातीन वर्षांनंतर हिंदूहृदयसम्राट हे नाव लागत आहे, त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे राज ठाकरे यांनी अभिनंदन व्यक्त केले. तसेच मी बाळासाहेबांचा वैचारीक वारसदार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जबरदस्त टोलेबाजी केली.

या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेले अनेकजण आणि उपस्थित नसलेले अनेकजण… यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, “ज्या व्यक्तीमुळे ही विधानभवनाची इमारत तुम्हाला बघायला मिळाली त्या स्व. बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र या इमारतीमध्ये लागत आहे, त्याबद्दल अभिमान वाटतो. शेकड्याने लोक विधानभवनात आली, मा. बाळासाहेबांनी त्यांना इथे पाठवले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती आहे की, त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेतही बाळासाहेबांचे तैलचित्र लावावे. म्हणजे आपण कुणामुळे विधान भवनात आलो, हे त्यांना कळेल.”

ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

हे वाचा >> “दुसऱ्यांचे वडील चोरताय, पण स्वत:चे वडील लक्षात ठेवा, नाहीतर…” PM मोदी, पवारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंवर हल्लाबोल!

वारसा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो

“बाळासाहेबांबद्दल बोलायचे झाल्यास तर माझा कडेवरचा सहवास आहे, बोट धरून चालण्याचा सहवास आहे. व्यंगचित्राचा सहवास आहे. कुठून सुरुवात करु? असा प्रश्न पडतो. मी शिशू वर्गात असताना बाळासाहेब स्वतः गाडी चालवत मला घ्यायला यायचे. लहानपणापासून मी विविध अंग बाळासाहेबांमध्ये पाहत आलो. वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो. माझ्याकडे काही आलं असेल तर तो विचारांचा वारसा आला आहे आणि तो मी जपला आहे. संस्कार कुणी करत नसतो, संस्कार समोरच्या व्यक्तीच्या कृतीतून वेचायचे असतात.”, अशा आठवणी राज ठाकरे यांनी यावेळी सांगितल्या.

हे ही वाचा >> “स्व. बाळासाहेब ठाकरेंना हिंदू धार्जिणे म्हणणे अर्धसत्य…”, अजित पवारांनी हिंदूहृदयसम्राट शब्दावर केले महत्त्वाचे भाष्य

असा होता तैलचित्र बसविण्याचा प्रवास

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी विधान भवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधान भवनात बसवण्याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात तैलचित्र लावण्याचे जाहीर केले. त्यानुसार २३ जानेवारी रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला गेला.