scorecardresearch

मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; उद्धव ठाकरे भाषण संपवून निघताच अंगावर ओतलं रॉकेल अन्…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर, घडला हा प्रकार

मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; उद्धव ठाकरे भाषण संपवून निघताच अंगावर ओतलं रॉकेल अन्…
(संग्रहीत छायाचित्र)

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मुंबईत मंत्रालयात एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तर, दुसरीकडे याच मंत्रालयाच्या परिसरात राज्यातील एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आत्महदहनचा प्रयत्न करणार शेतकरी मुळचा जळगावमधील असून, सुनील गुजर असं त्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मका व सोयाबीन व्यवहारात आडकाठी होत असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि यातूनच या शेतकऱ्याने आज मंत्रालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली व सुरक्षा व्यवस्थेत थोडी शिथिलता आल्यानंतर या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं व अनर्थ टळला. सध्या त्या शेतकऱ्यास मरिनड्राईव्ह या पोलीस स्टेशनला नेण्यात आलं असून, चौकशी सुरू आहे.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-08-2021 at 10:49 IST

संबंधित बातम्या