डॉक्टरांचा चर्चासत्रातील सूर, उपचार पद्धती प्रभावी नसल्याचा दावा

ऑटिझमला (स्वमग्नता) कारणीभूत ठरणाऱ्या मज्जासंस्थेच्या बिघाडावर मात करण्यासाठी स्टेम सेल थेरपी प्रभावी असल्याचा दावा फसवा आहे, असा सूर ‘फोरम फॉर ऑटिझम’ (एफएफए) या संस्थेच्या वतीने आयोजित ‘ऑटिझमग्रस्त प्रौढ व्यक्तींसाठीच्या सोईसुविधांची वानवा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये उमटला. या उपचार पद्धतीसाठी तीन ते पाच लाख रुपये खर्च होतो. मात्र, तिचा उपयोग नसल्याचे चर्चासत्रात सांगण्यात आले.

Commodity SEBI Developed Commodity Futures Market print eco news
क… कमॉडिटीचा : हवामान वायद्यासाठी ‘सेबी’ने तत्परता दाखवावी
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
Infrastructure and Real Estate Sector in Mumbai
मुंबईतील पायाभूत सुविधा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र

‘‘ऑटिझम हा आजार नसून ती मेंदूच्या विकासाशी संबंधित अवस्था आहे. त्यामुळे ही अवस्था कोणत्याही औषधाने तात्काळ बरी होऊ शकत नाही. त्यामुळे स्टेमसेल थेरपीने हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो, असा दावा फोल आहे,’’ असे या चर्चासत्राला उपस्थित असलेले विकासात्मक बालरोगतज्ज्ञ डॉ. हमीद दलवाई यांनी सांगितले. स्टेम सेल ही प्रयोगशील थेरपी असून याबाबत अजून संशोधन सुरू असून ती यशस्वी झाल्याचे सिद्ध झालेले नाही. मात्र या थेरपीमुळे ऑटिझम बरा होत असल्याचे सांगून पालकांकडून लाखो रुपये सध्या उकळले जातात. या थेरपीविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासामधले निकषही चुकीचे आहेत, असेही ते म्हणाले.

उम्मीद बालक विकास केंद्राच्या विकासात्मक बालरोगतज्ज्ञ डॉ. कोएली सेनगुप्ता यांनीही स्टेम सेल थेरपीवर आक्षेप नोंदवला. ‘‘संशोधनात्मक प्रयोग बालकांवर केला जात असल्याने मोफतपणे ही थेरपी दिली जाणे अपेक्षित आहे. मात्र सध्या चित्र वेगळेच असून अशा थेरपीच्या नावाखाली पालकांची लूट केली जात आहे. तेव्हा पालकांनीही सावधपणाने ऑटिझमसाठी आपण कोणते उपचार घेत आहोत, त्याचे फायदे, तोटे याचा  विचार करूनच उपचार पद्धती निवडावी,’’ असे त्यांनी सांगितले.

स्टेम सेल थेरपीम्हणजे काय?

यामध्ये पाठीचा मणका, चरबी आणि दातांमधील पेशींचा वापर केला जातो. या प्रक्रियेत ऑटिझमग्रस्त मुलाच्या रक्तातून मूलपेशी घेऊन मणक्यातून इंजेक्शनद्वारे मेंदूपर्यंत पोहोचविल्या जातात. या पेशींमुळे रोगप्रतिबंधक शक्तीमध्येही संतुलन येऊन ऑटिझमवरील उपचारांना चालना मिळते, असा दावा ही पद्धती विकसित करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे.

अन्य उपचार घ्यावेत

‘‘स्टेम सेल थेरपीचा वापर फक्त प्रयोगशाळांमध्ये करण्याची परवानगी आहे.  त्यामुळे अनेक वर्षांच्या संशोधनातून सिद्ध झालेल्या इतर उपचार पद्धतींचा अवलंब करावा,’’ असा सल्ला शीव रुग्णालयातील ऑटिझम इंटरव्हेन्शन केंद्रातील प्रकल्प प्रमुख डॉ. मोना गजरे यांनी दिला आहे.