मुंबई : मोठय़ा विद्यापीठांच्या तुलनेत लहान विद्यापीठांच्या माध्यमातून शैक्षणिक विकास व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे अधिक सुलभ असते. सध्या केंद्र सरकार लहान विद्यापीठांच्या स्थापनेला प्रोत्साहन देत आहे. यामुळे मुंबईतील तीन नामांकित महाविद्यालयांचा समावेश असलेल्या हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी)समूह विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी एचएसएनसी समूह राज्य विद्यापीठाच्या पहिल्यावहिल्या दीक्षांत समारोह सोहळय़ात केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या समारंभाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ व जागतिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.‘विद्यार्थ्यांनी संतुलित, सुसंस्कृत, सुविद्य, समृद्ध तसेच जातीविरहित भारत निर्माण करण्याचे ध्येय बाळगावे’, असे मत माशेलकर यांनी व्यक्त केले. या वेळी एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. निरंजन हिरानंदानी, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, कुलसचिव भगवान बालानी, परीक्षा मंडळाचे संचालक एम. एन. जस्टीन उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagatsingh koshyari koshyari challenged the establishment of small universities amy
First published on: 12-02-2023 at 03:28 IST