भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे हत्याप्रकरणी दोघांना अटक केली असून आणखी पाच आरोपी फरार आहेत. महेश म्हात्रे आणि मयूर म्हात्रे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून या दोघांनी मनोज म्हात्रे यांच्या खुनाची कबुली दिली असल्याचे बोलले जाते. यापूर्वी मनोज म्हात्रे यांचे चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे याला संशयावरून अटक करण्यात आली आहे. राजकीय वैमनस्यातून प्रशांत याने मनोज म्हात्रे यांची हत्या घडवून आणल्याचा दावा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. परंतु उर्वरित आरोपींनाही २४ तासांत अटक न केल्यास काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Congress News
काँग्रेसला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यावर निवडणूक आयोगाकडून प्रचारबंदीची कारवाई
chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप
Uday Samant, Accused, Congress, Defaming Women, in Party, Claims, Rashmi Barve, Nomination Form, Would be Cancelled, ramtek, lok sabha 2024, maharashtra politics, shinde shiv sena group, marathi news,
“रश्मी बर्वे यांना उमेदवारी देणे हे काँग्रेसचे षडयंत्र,” उदय सामंत यांचा आरोप; म्हणाले, “काँग्रेस महिलांवर अन्याय..”

भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते असलेले मनोज म्हात्रे अंजूरफाटा परिसरात राहत होते. काही कामानिमित्त काही दिवसांपूर्वी रात्री ते आपल्या इमारतीखाली आले होते. त्याचवेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर दोघांनीही कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यानंतर मारेकरी पसार झाले. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मनोज म्हात्रे यांना तत्काळ ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलीस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यादिशेने पोलीस तपास सुरू होता. हल्ल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच मनोज म्हात्रे यांची हत्या घडवून आणल्याच्या संशयावरून त्यांचा चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही मनोज म्हात्रे यांची हत्या प्रशांत म्हात्रे याने घडवून आणल्याचा दावा केला होता. या प्रकरणी तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी सांगितली. या प्रकरणातील उर्वरित संशयितांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समजते.