मुंबई : बाई जेरबाई वाडिया रुग्णालय व सिप्ला फाउंडेशनमार्फत ‘तितली’ या नावाने पहिली पँलेएटिव्ह होम केअर सेवा सुरू करण्यात आली आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले बालक, तसेच त्यांच्या कुटुंबाला मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सेवेअंतर्गत मुंबईत कुलाबा ते दहिसर आणि ठाणे ते ट्रॉम्बे या भागांमधील बालकांना डॉक्टर परिचारिका आणि समुपदेशक उपलब्ध करण्यात येणार आहेत. मधुमेह, एचआयव्ही, थॅलेसेमिया, मस्क्युलर, डिस्टोफी आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचे निदान झाल्यानंतर पँलेएटिव्ह केअर मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे बी. जे. वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मिनी बोधनवाला यांनी सांगितले आहे.