नव्या परमिटधारक रिक्षा जाळण्याचे आंदोलन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तूर्तास स्थगित करुनही त्याचे पडसाद उमटतच आहेत. दिंडोशीमध्ये रविवारी भाजप आणि मनसे कार्यकर्ते भिडले.
मनसेला भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी पत्रक काढून उत्तर दिले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणाला त्रास दिला तर त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. याविषयी कळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री मोहित कम्बोज यांच्या दिंडोशी येथील कार्यालयावर दगडफेक करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याची प्रतिक्रिया रविवारी सकाळी भाजप कार्यकर्त्यांकडून उमटली. मनसेच्या दिंडोशी येथील कार्यालयावर हल्ला करण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp and mns fight in dindoshi
First published on: 14-03-2016 at 02:55 IST