‘व्होट बँक’साठी काँग्रेसकडून अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केले जात असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपलाही निवडणुकांच्या तोंडावर अल्पसंख्याकांच्या मतांची आवश्यकता वाटू लागली आह़े त्यामुळे हज यात्रेच्या धर्तीवर ख्रिस्ती समाजालाही जेरुसलेमची यात्रा करण्यासाठी निधीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्याची मागणी भाजपचे विधान परिषदेतील आमदार आशीष शेलार यांनी केली आह़े भाजपचे मुखपत्र ‘मनोगत’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आह़े
राज्यात १८ लाख ख्रिस्ती बांधव आहेत आणि त्यांच्यासाठी एक कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची शेलार यांची मागणी आह़े परंतु अशी तरतूद न करण्यात आल्याने शेलार यांनी थेट अर्थमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याचे शेलार यांनीच ‘मनोगत’मध्ये म्हटले आह़े
वास्तविक भाजपतील मुंडे आणि गडकरी या दोन्ही गटांशी सख्य राखून असणाऱ्या शेलार यांनी २००९ साली मोठय़ा प्रमाणात ख्रिस्ती समाज असणाऱ्या वांद्रे येथून विधानसभेची निवडणूक लढविली होती़ परंतु ‘हिंदुत्ववादी भाजप’च्या या उमेदवाराला तेथे पराभूत व्हावे लागले होत़े त्यानंतर विधान परिषदेची माळ गळ्यात पाडून घेतल्यानंतरही आगामी निवडणुकीत कोणा ना कोणाच्या माध्यमातून आपला मतदारसंघ राखण्याची महत्त्वाकांक्षा असल्यानेच शेलार यांना अचानक ख्रिस्ती बांधवांचा पुळका आल्याचे बोलले जात आह़े
परंतु व्होट बँक राखण्याच्या या स्टंटचा मुंबई अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या शेलार यांना संघटनांतर्गत फटका बसण्याची शक्यता आह़े कारण ‘अभाविप’पासूनच्या या निष्ठावंताने आता व्होट बँकसाठी ‘फितुरी’ केल्याच्0ाी भावना बजरंग दल, विहिंपसारख्या परिवारातील संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आह़े या संघटनांच्या बैठकांमध्येही याबाबत तीव्र आक्षेप घेण्यात आल्याचे कळत़े
ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कारवाया पाहता त्यांना अनुदान देणे म्हणजे धर्मातराला खुले द्वार करण्यासारखे आह़े ख्रिस्तींच्या अनुदानाचा पुळका आलेल्यांनी हिंदूंच्या अनुदानासाठी कितीदा असे प्रश्न उपस्थित केले, असा सवाल विहिपचे केंद्रीय सहमंत्री (विशेष संपर्क विभाग) व्यंकटेश आबदेव यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलन करणार
आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये ख्रिस्ती समाजाला अशा प्रकारचे अनुदान दिले जात़े त्याप्रमाणे महाराष्ट्रातही देण्यात याव़े या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत्या अधिवेशनात विधान परिषदेत पायरीवर बसून आंदोलन करणार आह़े मी ख्रिस्ती बांधवांसाठी मागणी केली आहे, तसे सिंधुदर्शनासाठी सिंधी बांधवांना अनुदान देण्याचा विचार व्हावा, असेही म्हटले आह़े, असे आशीष शेलार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.