scorecardresearch

“जोपर्यंत महिला अशा लोकांचं ‘खेटरं पुजन’ करणार नाही, तोपर्यंत यांचा मेंदू…”, चित्रा वाघ यांचा वडेट्टीवारांवर हल्लाबोल

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करण्याला आमचा विरोध असल्याचं म्हटलं. यातून त्यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडून जाहीर झालेल्या मातोश्रीबाहेरील हनुमान चालिसा आंदोलनाला विरोध दर्शवला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, “कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करणे याला आमचा विरोधचं आहे, पण हनुमान चालिसाचे पठण करणे हा हिंदूस्थानात देशद्रोह कसा काय होऊ शकतो? तसेच महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरणाऱ्या मंत्र्यांचा मी निषेध करते. अशा लोकांचं महिला जोपर्यंत ‘खेटरं पुजन’ करणार नाही, तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही.”

Koo App
कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करणे याला आमचा विरोधचं.. पण हनुमान चालिसाचे पठण करणे हा हिंदूस्थानात देशद्रोह कसा काय होऊ शकतो? तसेच महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरण्याऱ्या मंत्र्यांचा मी निषेध करते अशांचं जोपर्यंत महिला खेटरं पुजन करणार नाही तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही #CMOMaharashtra #AjitPawarSpeaks #bbthorat #DevendraFadnavis #ChandrakantPatil #SudhirMungantiwar #BJPMaharashtra
View attached media content
– Chitra Kishor Wagh (@ChitraKishorWaghCRKB) 25 Apr 2022

आपल्या एका ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत देण्यात आलेल्या पुरस्काराची पत्रिका शेअर करत शिवसेनाला टोला लगावला. यात चित्रा वाघ म्हणाल्या, “मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रभू कुंजला आता महापालिकेची नोटीस येणार काय? मातोश्रीतून ‘सूड दुर्गे सूड’ असे आवाज येतायत म्हणे…”

हेही वाचा : “वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली”

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. यात वडेट्टीवार राणा दाम्पत्याला शिवीगाळ करून बोलताना दिसत आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीकाही केली जात आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader chitra wagh criticize vijay wadettiwar over remark on navneet ravi rana pbs

ताज्या बातम्या