अयोध्येतील राम मंदिर उभारणीमधील कामात जमीन खरेदी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून यावरुन शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपा संतापली आहे. शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपा जनता युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आल्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये मोठा वाद झाला आहे. शिवसेना भवन परिसरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली असून अखेर पोलिसांना बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली आहे. दरम्यान शिवेसना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होता असा गंभीर आरोप स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना भवनसमोर भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

“भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनात जमले होते. पण जेव्हा भाजपाचे काही कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली,” अशी माहिती स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होती असा आरोपही केला आहे. सदा सरवणकर यांनी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण झालेली नसून माझ्या निदर्शनास आलेलं नाही सांगत आरोप फेटाळले आहेत.

भाजपाकडून बडे चौक ते शिवसेना भवनपर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला सांगताना त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ करण्यात आली असं महिला आघाडीचं म्हणणं आहे अशी माहिती दिली. दरम्यान आमची ३० वर्षांची युती होती हे भाजपा विसरलं आहे अशी टीकाही त्यांनी केली.

नेमकं काय झालं –

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

“मोहन भागवतांनी खुलासा करावा,” राममंदिर जमीन खरेदीतील भ्रष्टाचारावरुन संजय राऊतांचा संताप

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजपा जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp planned to attacked shivsena bhavan claims mla sada sarvankar sgy
First published on: 16-06-2021 at 17:28 IST