मुंबई : मुंबईतील बंद करण्यात आलेल्या चार जम्बो करोना केंद्रांतील सुमारे सहा हजारांहून अधिक साधारण आणि प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा, पाचशे अतिदक्षता खाटा, कृत्रिम श्वसनयंत्रणा इत्यादी उपकरणे आणि सामग्री एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पालिकेच्या रुग्णालयांनी यासाठी प्रस्तावही पाठविण्यास सुरुवात केली आहे.  करोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरल्यामुळे पालिकेने गोरेगावचे नेस्को, मुलुंड र्चिडसन अ‍ॅण्ड क्रुडास, दहिसर आणि कांजूरमार्ग ही जम्बो करोना रुग्णालये १ मार्चपासून बंद केली आहेत. कांजूरमार्गचे करोना केंद्र करोनाच्या तिसऱ्या लाटेत कार्यान्वित झाले. परंतु अन्य तीन रुग्णालये ही करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये पूर्ण काळा सुरू होती. आवश्यक सामग्री काही राज्य आणि केंद्र सरकारकडून प्राप्त झाली होती. तर बहुतांश सामग्री पालिकेने खरेदी केली आहे.  गोरेगावच्या नेस्को करोना केंद्राची सुमारे ३७०० खाटांची क्षमता होती. यात २०० खाटांचा अतिदक्षता विभाग होता. रुग्णालय बंद होणार याची कल्पना पालिकेने दिल्यामुळे खाटा, शेजारचे टेबल, रुग्णांसाठी आवश्यक सर्व उपकरणे, अतिदक्षता विभागातील कृत्रिम श्वसनयंत्रणेसह सामग्री यांची यादी बनविण्यास सुरुवात केली होती. यातील काही उपकरणांची यादी आधीच पालिकेच्या रुग्णालयांना पाठविलेली आहे. यातील कूपर, नायर, केईएम, शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय यांनी आवश्यक सामग्रीचे प्रस्तावही पाठविण्यास सुरुवात केली आहे. यातील आवश्यक खाटा, खुर्च्या इत्यादी आवश्यक सामग्री नायर दंत रुग्णालयाच्या नव्या इमारतीसाठी पाठविले जात आहे. आलेल्या प्रस्तावांना पालिकेने मंजुरी दिल्यावर हे सामान त्या त्या रुग्णालयांमध्ये हलविले जाईल. तूर्तास या सर्व प्रक्रियेस जवळपास एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc closed four jumbo corona centers in mumbai zws
First published on: 04-03-2022 at 02:18 IST