माहीम येथील गांधी मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या ठिकाणी पाणी भरण्यास कारणीभूत ठरणारा मुख्याध्यापक व धोबीघाट नाल्यातील गाळ काढण्यासाठी काठावरील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्यासाठी पालिका पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे. स्थानिक व राजकीय पक्ष यांनी या कारवाईसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

धारावीमधील मुख्याध्यापक व धोबीघाट या नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो. नाल्यांच्या दोन्ही काठांवर उभ्या राहिलेल्या अतिक्रमणामुळे सफाई करण्यात अडथळे येतात. ही अतिक्रमणे पाडण्यासाठी २६ मे व त्यानंतर २ जून रोजी प्रयत्न करण्यात आला. यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. मात्र या काठावर असलेली धार्मिक स्थळे पाडण्यासाठी स्थानिक, विविध संघ तसेच राजकीय पक्षांचा विरोध पाहून पोलिसांनी ही कारवाई थांबली. मात्र नाल्यातील गाळ काढण्यासाठी सर्व अतिक्रमणे तोडण्याची आवश्यकता असून राजकीय पक्ष, संघटना, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.